किरकोळ / नैमित्तिक रजा संदर्भात प्रशासनांकडून महत्वपुर्ण निर्देश ; परिपत्रक निर्गमित !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important instructions from the administration regarding minor/casual leave ] : विभागीय आयुक्त छ.संभाजीनगर यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार , किरकोळ / नैमित्तिक रजा घेण्याकरीता सक्षम प्राधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

काही अधिकारी / कर्मचारी कार्यक्षेत्राच्या बाहेर जाण्यापुर्वी / नेमित्तिक रजेवर जाण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घेत नसल्याचे निदर्शनास आले असून , म. ना.सेवा नियम 1981 चे नियम 10 ते 12 नुसार , शासकीय कर्मचारी यांनी मंजूर झाल्यावरच त्याचा उपभोग घेणे आवश्यक असून , रजा मंजूर करणारा अधिकारी जो पर्यंत रजा मंजूर करत नाही , तो पर्यंत रजेवर जाता येत नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत .

यामुळेच रजेवर जाण्याचा कर्मचाऱ्यांचा हक्क नाही , रजा मंजूर झाली तरी रजेवर गेलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना रजा नियम 46 नुसार , रजेवर परत बोलावता येते असे नमुद करण्यात आलेले आहेत .

सदरची बाब लक्षात घेता शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी मुख्यालय सोडण्यापुर्वी सक्षम प्राधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्यामुळे त्याचे कटाक्षाने पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच वित्त विभागाकडील शासन दि.21.12.1998 नुसार , शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना एका कॅलेंडर वर्षांमध्ये जास्तीत जास्त 08 नैमित्तिक रजा अनुज्ञेय असल्यामुळे , या मर्यादेपेक्षा जास्त नैमित्तिक रजेची परवानगी दिली जाणार नाही ..

याचे कटाक्षाने पालन करण्याचे व सदर नैमित्तिक रजा लेख्याची नोंद अचूकरित्या ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच आकस्मिकपणे व अनपेक्षित उद्भवणाऱ्या परिस्थितीचे अपवाद वगळता नैमित्तिक रजेवर जाण्यापुर्वी सक्षम प्राधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment