Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागांकडून दि.15 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी करावयाची कार्ये ,ई- आफीसेस , कामकाज इ.बाबींवर लक्ष केंद्रीय करण्यात आलेले आहेत .

शाससकीय कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या दृष्टीने मंत्रालयीन विभागांतील अधिकारी / कर्मचाऱ्यांमध्ये अधिकार / जबाबदार विहीत करणे आवश्यक आहे . त्यानुसार मुख्य सचिव / अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सह उपसचिव , उपर सविच , कार्यासन अधिकारी मा.मंत्री / मा.राज्यमंत्री यांचे स्वीय कर्मचारी , वरिष्ठ स्वीय सहाय्यक  / स्वीय सहायक / लघुलेखक , सहायक कक्ष अधिकारी , लिपिक टंकलेखक , बहु कार्य कर्मचारी यांच्या अधिकारांचा कामांची विभागणी करण्यात आली आहे . शिपाई दफ्तरी , जमादर , परिचालक , चौकीदार , सफाईवाला इ.गट ड च्या कर्मचाऱ्यांना मल्टी टास्किं स्टाफ असे संबोधण्यात आले आहेत .

तसेच मंत्रालयातील प्रशासकीय विभागांना क्षेत्रीय कार्यालयांतुन व नागरिकांकडून प्राप्त होणारे दैनंदिन टपाल मंत्रालय मध्यवर्ती टपाल केंद्र येथे ई – मेल / ई – ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून स्विकृत करुन ते मध्यवर्ती टपाल केंद्रातून संबंधित विभागांच्या नोंदणी शाखेमार्फत संबंधित विभागातील कार्यासनांना पाठविण्याबाबतची कार्यपद्धती विशद करण्यात आली आहे .या माध्यमातून शासकीय कामकाज पारदर्शक , गतीमान होणार असून वेळेचा अपव्यय टाळणे शक्य होणार आहे . तसेच शासकीय कामकाजामध्ये ई – ऑफीस प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे , क्षेत्रीय कार्यालयात देखील टपाल मध्यवर्ती ई-टपाल केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांचे पदोन्नती प्रक्रिया तात्काळ राबविणे बाबत आत्ताची मोठी अपडेट , परिपत्रक निर्गमित !

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच इतर शासकीय कार्यालयातील सहायक / प्रमुख लिपिक / वरिष्ठ लिपिक / लिपिक वर्ग 3 कर्मचाऱ्यांकडून फाईल इ. निर्णयार्थ टिप्पणीसह सादर केल्या जातात , त्याचप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . मात्र अशा कर्मचाऱ्यांकडून एक वरिष्ठ टप्पा वगळून त्यावरील अधिकाऱ्यांना थेट सादरीकरण करण्याचे निर्देश देता येणे शक्य असल्यास प्रकरणपरत्वे त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

तसेच कार्यालसनाच्या प्रमुखाने त्याच्या कार्यासनाचे महिन्यातून एकदा निरीक्षण व जानेवारी ,एप्रिल , जुलै व ऑक्टोंबर महिन्यांमये तिमाही तपशिलवार निरीक्षण करण्याचे आदेश उदेण्यात आलेले आहेत .

सदर महाराष्ट्र कर्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका 2023 च्या अंमलबजावणी बाबत सा.प्र.विभागांकडून दि.15 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

शासन निर्णय

आपण जर शासकीय -निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *