Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ magel tyala Sour Pump anudan yojana ] : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला सौरपंप अनुदान मंजूर करण्यात येत आहेत . या संदर्भात राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा व कामगार व खनिकर्म विभाग मार्फत दिनांक 25.07.2024 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरची योजना ही राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांचे थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – 2024 राबविण्यात येत आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , भारतातील शेती मुख्यत : पावसावर अवलंबून आहे , मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून , त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत . अशा अडचणीत झालेल्या राज्यातील 7.5 एच.पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे .
सदर योजनेचा कालावधी : सदर योजना ही 5 वर्षासाठी माहे एप्रिल 2024 ते माहे मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे . मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेवून पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे .
पात्रता : राज्यातील 7.5 एच.पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत . सदर शेती पंप शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !