Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee payment anudan shasan nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासाठी अनुदान वितरण करण्यात आले आहेत , या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आला आहे .
सदर शासन निर्णयानुसार वित्त विभागांकडून अर्थसंकल्पीय वितरणी प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाच्या निधी नियंत्रक अधिकारी ( आयुक्त – शिक्षण , महाराष्ट्र राज्य , पुणे व सह सचिव / उप सचिव , शलेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय , मुंबई यांना वितरीत करण्याची बाब शासनांच्या विचाराधीन होती .
यानुसार सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकरीता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्याकरीता मान्यता देण्यात येत आहेत .
यांमध्ये सर्वसाधार शिक्षण , प्राथमिक शिक्षण , जिल्हा परिषदांना सहाय्य , प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांना सहाय्य , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 182 नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने म्हणून 20000/- रुपये मंजूर करण्यात आले आहेत ..
तर सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , शिक्षक व इतर सेवा , समर्ग शिक्षा अभियान ( सर्वसाधारण / राज्य हिस्सा ) या लेखाशिर्षाकरीता 51419.854/- रुपये व 151731.387/- रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे .
या संदर्भातील निधी वितरण करणेबाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.