NPS धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत , वित्त विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.30.12.2024

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ NPS amount transfer new rules ] : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदान रकमा प्रान खाती जमा करण्याबाबत सुधारित कार्यपद्धती संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकरी / कर्मचारी यांच्या वेतन देयकामधून दरमहा केवळ कर्मचाऱ्यांच्या अंशदानाची वसूली ( मूळ वेतन + महागाई वेतन ( असल्यास ) + महागाई भत्ता या रकमेच्या 10 टक्के ) करण्यात यावी . यांमध्ये नियोक्त्याच्या अंशदानाचा समावेश नसावा असे नमुद करण्यात आले आहेत .

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी तसेच महाराष्ट्र संवर्गातील आखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांची वेतन देयके स्वतंत्रपणे तयार करुन ती प्रत्येक महिन्यांच्या 22 तारखेपर्यंत अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच कर्मचाऱ्यांच्या मासिक अंशदानाची रक्कम व तपशिल दर्शविणरी आवश्यक ती अनुसूची वेतन देयकासोबत जोडण्याची संपुर्ण जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची असेल .

तसेच नियोक्ता / शासनाच्या 14 टक्के अंशदानाचे अधिकारी / कर्मचारी यांचे Projected Employer Contribution Sehedule वेतन देयकासोबत तयार होईल . आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदरच्या अनुसूचीतील नियोक्ता / शासनांच्या 14 टक्के अशंदानाच्या रकमेची परिगणना तपासून प्रमाणित करावी व सदरचे Schedule वेतन देयकासोबत जोडावेत असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची नियमित वेतन देयके सेवार्थ प्रणालीमध्ये तयार करताना , कर्मचाऱ्यांच्या 10 टक्के तसेच नियोक्ता / शासनांच्या 14 टक्के अंशदानाच्या रकमा Auto – Calculate होतील असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीत समाविष्ट असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या आयकराची परिगणना करताना , नियोक्ता / शासनाच्या अशंदानाची 14 टक्के रक्कम वेतनाच्या स्थूल रकमेमध्ये नियोक्ता / शासनांच्या अंशदानाची अधिकारी / कर्मचारी निहाय यादी सेवार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध असेल असे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment