वेतनत्रुटी निवारण समितीला वारंवार मुदतवाढ का ? अहवाल कधी सादर होणार , जाणून घ्या महत्वपुर्ण अपडेट !

Spread the love

Live marahitpepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee vetantruti nivaran samiti mudatvadh ] : सातवा वेतन आयोगांमध्ये वेतनत्रुटी आढळून आलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनांकडून वेतनत्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे . सदर समितीला वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे .

आत्तापर्यंत सदर समितीला मुदतवाढ देणेबाबत 3 पेक्षा अधिक वेळा देण्यात आलेली आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीकरीता आणखीण किती दिवस प्रतिक्षा करावी लागेल असा प्रश्न उपस्थित होत आहे . सदर वेतनत्रुटी निवारण समिती ही न्यायालयाच्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेली आहे .

न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार , सातव्या वेतन आयोगांमध्ये अनेक अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये त्रुटी आहेत ,सदरच्या त्रुटी दुर करुन सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत सुचित करण्यात आलेले आहेत .

सदर समितीला अहवाल तयार झाला असून देखिल वारंवार सदर समितीला मुदतवाढ का दिली जात आहे . असा कर्मचाऱ्यांना प्रश्न उपस्थित होत आहे .सदर अहवालास , आणखीन 2 महिन्यांचा अवधी लागु शकणार आहे .

कारण राज्य शासन अर्थसंकल्पाशिवाय सदर अहवालास मंजूरी दिली जाणार नाही , अशी संभावना आहे . यामुळे अशा प्रकारची मुदतवाढ आणखीन दिली जावू शकते .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment