राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना नाहीच , अन्यथा सरकार दिवाळखोरीत – विद्यमान मा. मुख्यमंत्री..

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ There is no old pension scheme for state employees, otherwise the government will go bankrupt – the present Hon. Chief Minister ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (old pension scheme) लागू करणे शक्य नसल्याचे , राज्याची मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये स्पष्ट केले आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनला (old pension scheme option) पर्याय म्हणून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना (new NPS) तसेच केंद्र सरकारची एकीकृत राष्ट्रीय पेन्शन योजना या पैकी एकाची निवड करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे . परंतु या दोन्ही योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना हवे तसे आर्थिक व सामाजिक न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहेत .

मागील हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकाकडून जुनी पेन्शनची मागणी केली असता , तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते की , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कदापी लागू केली जाणार नाही , अन्यथा सरकार दिवाळखोरीत जाण्याची भीती आहे असे वक्तव्य केले होते . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना विद्यमान सरकार लागू करणार नाही असे अनेकांची मत आहे ..

तर सरकारने यावर तोडगा काढीत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे . परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवल्याने , कर्मचाऱ्यांना आर्थिक तोटा होईल . यामुळे जुनी पेन्शन योजनाच (OPS ) लागू करण्याची मागणी केली जात आहे .

विद्यमान सरकारकडून जुनी पेन्शनचा  (Old pension) मुद्दा सोडवला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे . यामुळे पुढील पाच वर्ष तरी जुनी पेन्शन (old pension) बाबत निर्णय होऊ शकणार नसल्याचे बोलले जात आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment