लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये सन 2005 नंतर शासन सेवेत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना पेन्शन व सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती उपदान लागु करणे संदर्भात राज्य शासनाच्या शा.शि व क्रिडा विभागांकडून दि.14 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दि.14 जुन 2023 रोजीच्या शासन निर्णानुसार राज्य शासन सेवेतील दिनांक 01.11.2005 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा ( ZP ) , मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा त्याचबरोबर माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयांमध्ये 100 टक्के अनुदानित पदावर NPS योजनेचे सदस्य असणारे कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत असतानांच मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुंटुब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान सदर शासन निर्णयानुसार लागु करण्यात येत आहेत .
तसेच रूग्णता सेवानिवृत्त झाले आहेत , अशा कर्मचाऱ्यांना रुग्णता पेन्शन आणि सेवानिवृत्ती उपदान लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .शालेय शिक्षण विभागाच्या दि.20.08.2019 नुसार लागु करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना ही वित्त विभागाच्या दि.31 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात आलेली आहे , सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येवू नयेत तसेच प्रलंबित प्रकरणे बंद करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
दिनांक 01 नोव्हेंबर 2005 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान , कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासनमध्ये नमुद नमुना -3 विकल्प आपल्या आस्थापना कार्यालय प्रमुखांकडे सादर करावे लागणार आहेत .
तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे सेवेत नियुक्त होणारा कर्मचारी यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन अनुज्ञेय करण्यात येणार आहेत .कुटुंब निवृत्तीवेतन तसेच सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती उपदान लागु करणेबाबत , शा.शि.व क्रिडा विभागांकडून दि.14 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !