सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ; कर्मचाऱ्यांचे “या” मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाची योजना !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Employees’ plan for a nationwide movement ] : देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्याकडे मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग (8th Pay commission) बाबत होत असणारा विलंब , याकरिता कर्मचारी महासंघाकडून देशव्यापी आंदोलनाची योजना आखली जात आहे , या संदर्भातील सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहूयात ..

कर्मचारी महासंघाकडून आठवा वेतन आयोग (8th Pay commission) स्थापन करण्यास , तसेच जुनी पेन्शन योजना (Old pension scheme) पुन्हा संरचित करण्यास होत , असणाऱ्या विलंबाबाबत सदर आंदोलन केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग स्थापन करण्याच्या प्रस्ताव , फेटाळल्यामुळे देशातील 01 कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे ..

दिनांक 01 जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होणे आवश्यक आहे , याकरिता भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ मार्फत देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले असून , यामध्ये नमूद करण्यात आली आहे की , सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग (8th Pay commission ) लवकरात लवकर स्थापन करण्यात यावा , त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी.

याशिवाय कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी सदर महासंघाकडून करण्यात आलेली आहे . जर सदर मागणीवर सरकारकडून सकारात्मक निर्णय न घेतल्यास देशांमध्ये महासंघाकडून , नवीन वर्षात देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

नुकतेच केंद्र सरकारचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट सांगितले की , आठवा वेतन आयोग (8th Pay commission) लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचारात नसल्याचे , स्पष्ट केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सदर नाराजगी असून , याबाबत तात्काळ निर्णय न घेतल्यास देशव्यापी आंदोलन कर्मचाऱ्यांकडून केले जाणार असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment