Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ A less important account was given to “these” senior leaders of the Grand Alliance ] : काल दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे . यामध्ये काही ज्येष्ठ नेत्यांना कमी महत्त्वाची खाते देण्यात आल्याने , त्यांचे महत्त्व कमी होणार आहेत..
महत्त्वाची खाती असल्यास मंत्र्यांना अधिक काम करता येते , ज्यामुळे जनसंपर्क अधिक वाढतो . परंतु काही ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्यावरील आरोपामुळे कमी महत्त्वाची खाते देण्यात आलेली आहेत . यामध्ये धनंजय मुंडे यांना कमी महत्त्वाची खाते देण्यात आली आहेत . कारण सध्या त्यांच्यावर बीड मधील सरपंचाच्या हत्याकांडामध्ये राजकिय हात असल्याच्या आरोपावरून त्यांना कमी महत्त्वाची खाते देण्यात आली आहेत .
यापूर्वीच्या सरकारमध्ये त्यांना कृषी हे महत्त्वाचे खाते देण्यात आले होते . परंतु सध्याच्या खाते वाटपामध्ये त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आली आहेत . जे की कृषी खात्यापेक्षा कमी महत्त्वाचे खाते आहे . यामुळे त्यांना एक प्रकारचा राजकीय फटका बसल्याचे बोलले जात आहे , तरी या उलट त्यांच्या बहिणी पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण व पशुसंवर्धन हे खाते देण्यात आले आहेत . हे खाते कमी असले तरी पंकजा मुंडे विधानपरिषद सदस्य असून देखील , त्यांच्याकडे खाते देण्यात आल्याने त्यांचे महत्त्व वाढणार आहे .
त्याचबरोबर गिरीश महाजन हे ज्येष्ठ नेते असून , त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन ,जलसंपदा खाते देण्यात आले आहे , जे की कमी महत्त्वाचे आहेत . याशिवाय चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते असून , त्यांना देखील उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य हे जुनेच खाते दिल्याने ते समाधान नसल्याचे बोलले जात आहे .
याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील , दादा भुसे , संजय राठोड यांना कमी महत्त्वाची खाते देण्यात आली आहेत . यामुळे सदर मंत्र्यांमध्ये नाराजगी दिसून येत असल्याचे बोलले जात आहेत..