Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahabank salary account benifits] : सॅलरी खाते (Salary account) असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बँकेकडून विविध योजना राबविण्यात येत असतात . यापैकी बँक ऑफ महाराष्ट्र कडून सॅलरी खाते असणाऱ्या ग्राहकांना विशेष योजना राबवली जाते . यामध्ये अपघात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तब्बल 40 लाख रुपये देण्याची तरतूद आहे .
बँक ऑफ महाराष्ट्र कडून महाबँक सॅलरी सेविंग योजना राबविण्यात येते , या अंतर्गत कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास , बँकेकडून तब्बल 40 लाख रुपयांचे विमा रक्कम मंजूर करण्यात येते . सदर रक्कम कर्मचाऱ्यांच्या वारशांना विनाअट तात्काळ दिली जाते .
याशिवाय अपघातामध्ये पूर्णतः अपंगत्व आल्यास , 40 लाख रुपये तर आंशिक अपंगत्व आल्यास , 20 लाख रुपयांचे विमा कवच देण्यात येते , याशिवाय विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यास 01 कोटी रुपये गोल्डन कव्हर , तर मेडिक्लेम म्हणून 01 लाख रुपये दिले जाते .
ही रक्कम इतर बँकेपेक्षा अधिक असून , पगारदार खाते असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर ठरते . याशिवाय सॅलरी अकाउंट वर वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना इतर बँकेपेक्षा कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येते .
यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले पगार खाते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये उघडण्याचे आव्हान बँकेचे मुख्य प्रबंधक यांच्याकडून करण्यात आले आहेत . जेणेकरून कर्मचाऱ्यांना अधिकाधिक आर्थिक फायदे मिळतील .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.