Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Chagan Bhujabal politics news ] : सध्या राज्याचे नवे मंत्रीमंडळ स्थापनेनंतर , मंत्रीपद न मिळालेले छगन भुजबळ हे आक्रमक भुमिका घेताना दिसून येत आहेत . तर छुप्या राजकारणांमध्ये वेगळेच गणित सुरु असल्याचे दिसुन येत आहेत .
यांमध्ये छगन भुजबळ यांच्या कडे सध्या दोन पर्याय उपलब्ध असल्याचे दिसुन येत आहेत . ते म्हणजे भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन , राज्यसभेत प्रवेश करणे . अशी संधी देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याचे छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते .
परंतु या करता छगन भुजबळ तुर्तास तयार नसल्याचे , सांगितले आहेत . कारण नुकतेच विधासभा निवडणुका पार पडल्या आहेत . अशात राज्यसभेवर जाण्यासाठी विधानसभा सदस्याचा राजीनामा द्यावा लागेल , त्यानंतरच राज्यसभेवर जाता येते . यामुळे छगन भुजबळ तुर्तास तयार नसल्याचे सांगण्यात आले आहेत .
तर सध्या मिडीयांमध्ये सुरु असलेल्या चर्चानुसार , छगन भुजबळ हे काही आमदार घेवून , राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) गटात प्रवेश करणार असल्याचे बातम्या समोर येत आहेत . परंतु यावर छगन भुजबळ यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही .
तर दुसरीकडे अजित पवार व छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या आहेत , मंत्रीपद न मिळाल्याने , छगन भुजबळ यांनी कसला वादा आणि कसला दादा अशा शब्दात अजित पवार यांच्यावर टिका केली आहे . यामुळे राजकारण अधिकच पेटले आहेत .