Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Maharashtra vidhanmandal shifali adhiveshan work time table ] : राज्याचे विधान मंडळाचे हिवाळी अधिवेशन कामकाज दिनांक 16 डिसेंबर पासून सुरू होणार आहे . तर कामकाजाचा शेवट 21 डिसेंबर 2024 पर्यंत राहणार आहे . या संदर्भातील कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर करण्यात आलेली आहे .
यामध्ये दिनांक 16 डिसेंबर रोजी अध्यादेश सभागृहाचे पटलावर ठेवणे , सन 2024-25 च्या पुरवणी मागण्या सादर करणे . तर दिनांक 17 डिसेंबर रोजी शासकीय कामकाज तसेच राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात येणार आहेत . त्यानंतर दिनांक 18 डिसेंबर रोजी नियमित शासकीय कामकाज व अधिवेशनाचा दुसरा दिवस असणार आहे .
तर दिनांक 19 डिसेंबर रोजी शासकीय कामकाज तसेच सन 2024-25 च्या पुरवण्या मागण्यावर चर्चा व मतदान असा दिनक्रम असणार आहे . त्यानंतर दिनांक 20 डिसेंबर रोजी नियमित शासकीय कामकाज व सन 2024-25 च्या पुरवणी मागण्यावर चर्चा व मतदान तसेच पुरवणी विनीयोजन विधेयक , अशासकीय कामकाज केले जाणार आहेत .
त्यानंतर दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या अधिवेशनाचे शासकीय कामकाज करण्यात येणार आहेत , या दिवशी अधिवेशन पूर्णपणे संपेल . त्यानंतर संपूर्ण शासकीय यंत्रणा मुंबईला रवाना होईल . या संदर्भातील सविस्तर तात्पुरती दिनदर्शिका खालील प्रमाणे पाहू शकता .
