राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 12.12.2024 निर्गमित झाले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) ; जाणून घ्या सविस्तर .

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan Nirnay dated 12.12.2024 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय (GR ) पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

अ) कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली योजना (NPS) लागू करणे संदर्भात GR : दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्याच्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना संदर्भात वित्त विभागाच्या दिनांक 31 ऑक्टोबर 2005 रोजीच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात आली आहे .

सदर निर्णयाच्या अनुषंगाने दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या मान्यताप्राप्त व 100% अनुदान प्राप्त दिव्यांगाच्या विशेष शाळांमधील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनाच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 01 नोव्हेंबर 2012 रोजीच्या शासन निर्णयानुसार , निश्चित करण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना प्रणाली / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 , महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ अनुज्ञेय ठरत नाहीत , असे नमूद करण्यात आले आहेत .

सदर शासन निर्णयानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर राज्यातील दिव्यांगाच्या मान्यताप्राप्त 100% अनुदानित विशेष शाळा , कार्यशाळा , मतिमंद मुलांचे बालगृहे यामधील अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली योजनेचा सदस्य आहे ..

हे पण वाचा : कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे संदर्भात , महत्वपूर्ण शासन ज्ञापन निर्गमित दि.12.12.2024

अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास ,  त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान , तर रुग्नता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे .

त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास व रुग्णता निवृत्तीवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील तरतुदीच्या प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन , रुग्णता निवृत्तीवेतन लागू करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत . याशिवाय 100 टक्के अनुदानित शाळा , कार्यशाळा , मतिमंद मुलांचे बालगृहे यामधील निवृत्त होणाऱ्या शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहेत .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता पुढील लिंक वर क्लिक करावेत . शासन निर्णय (GR)

आ) कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित दुसरा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी : Click Here

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment