Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Kalpanik vetanvadh shasan nirnay gr ] : काल्पनिक वेतनवाढ लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , केंद्र शासनांच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या दिनांक 30 जून / 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन मंजुर करण्याकरीता अनुक्रमे दिनांक 01 जुलै / 01 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ देणेबाबतच्या …
दिनांक 28 ऑक्टोंबर 2024 च्या पत्राची व त्या सोबतच्या दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 च्या ज्ञापनाची प्रत उचित कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे . या संदर्भात नमुद पत्र व विषय सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
सदर पत्रातील व कार्यालयीन ज्ञापनातील सुचनांनुसार व पत्रानुसार करण्यात आलेली कार्यवाही ही मा.सर्वोच्च न्यायालयातील रिव्ह्यु पिटीशन वरील अंतिम निर्णयाच्या अधिन निर्णयाच्या अधिन राहील असे नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील सामान्य प्रशासन विभाग मार्फत निर्गमित सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.