Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farmer help anudan shasan nirnay ] : राज्यातील अतिवृष्टी / पुर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतनिधी जाहीर करणेबाबत , राज्य शासनांच्या महसुल व वन विभाग मार्फत दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , अतिवृष्टी , पुर , चक्रिवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास , पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे या करीता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपात एका हंगामात एक वेळेसे या प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विहीत दराने मदत देण्यात येते .
तर माहे जुन ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी / पुर या सारख्या परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देणेकरीता शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार एकुण 2922057.50 लक्ष रुपये ( अक्षरी – दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार रुपये फक्त ) इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसिल व जिल्हा कार्यालयाने कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदरच्या शासन निर्णयांमध्ये विभाग / जिल्हा निहाय बाधित शेतकरी संख्या / बाधित क्षेत्र याबाबतचा सविस्तर तपशिल नमुद करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here (GR PDF)