Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer shasan paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली अधिकार संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक ग्राम विकास विभाग मार्फत दि.02.12.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरचे शासन परिपत्रक कार्यासन अधिकारी यांच्याकडून मे.विन्सीस आय.टी सर्विसेस प्रा.लि. पुणे यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे . यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना मुद्दा क्र.4.4.7 नुसार पती – पत्नी एक युनिटचा लाभ देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणेबाबत , बाबी नमुद करण्यात आलेल्या आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांनी मुद्दा क्र.4.4.7 नुसार पती – पत्नी एक युनिटचा लाभ घेण्याची मागणी केली असेल , तर त्यांनी दिलेल्या 30 प्राधान्य क्रम शाळांमध्ये दोघांची रिक्त जागांवर बदली होणे आवश्यक आहे .

यापैकी एका शिक्षकाची बदली रकता येणार नाही , त्यामुळे एक युनिटचा लाभ मिळत नाही . सबब बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ( टप्पा क्र.4 ) या टप्यांवर संबंधित शिक्षक यांनी मुद्दा क्र.4.4.7 नुसार एक युनिटचा लाभ देण्याची मागणी केली असल्यास ….

सदर पती – पत्नी शिक्षक या दोघांचीही त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेवून बदली करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार , करण्यात यावी . असे नमुद करण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed