Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee payment anudan & allowance paid anudan ] : कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान अदा करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , तर अंगणवाडी सेविका / मदतनिस यांचे मानधन व प्रात्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत .
शालेय शिक्षण विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार , सन 2024-25 या वित्तीय वर्षात शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला तसेच वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहेत .
अंगणवाडी सेविका / मदतनिस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधींचे वितरण : राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे माहे नोव्हेंबर 2024 या महिन्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरीता निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत .
याकरीता एकुण 23898.00 लाख रुपये निधींचे वितरण अंगणवाडी सेवा , अतिरिक्त राज्य हिस्सा तसेच मजूरी , एकात्मिक बाल विकास सेवा योजना , विशेष पोषण आहार कार्यक्रम , सर्वसाधारण खर्च या लेखाशिर्षा खाली निधींचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले तिन्ही ( 03 ) शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.