लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्यातील कंत्राटी ग्रामसेवक व शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 10 हजार रुपयांनी ग्रामसेवकाचा पगार वाढणार; तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोटींचा निधी मंजूर करण्यात आली आहे .तसेच ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करण्याचा नवीन निर्णय प्रशासनाने हाती घेतला असून आता यासाठी 1500 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे.
Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित केले. या बैठकीत शेतकरी वर्गाला कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंत्राटी ग्रामसेवक असतील त्यांच्या वेतनमानामध्ये तब्बल दहा हजार रुपयांची वाढ होईल. ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत प्रदान केली जाईल. या माध्यमातून तब्बल पंधराशे कोटींचा निधी मंजूर केला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय पुढीलप्रमाणे : सतत पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे आतापर्यंत नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत केली जाईल. यासाठी पंधराशे कोटी चे मान्यता मिळाले आहे.कंत्राटी ग्रामसेवकांना आता प्रत्येक महिन्याला वेतन मान वाढवून मिळेल. म्हणजे आता प्रति महिना सोळा हजार रुपये मिळतील.
हे पण वाचा : राज्यातील नागरिकांचे वीजबिल सरसकट माफ , राज्य शासनाचा मोठा निर्णय !
सध्या कंत्राटी ग्रामसेवकांना सहा हजार रुपयांचा पगार मिळत होता. परंतु तो फार कमी असल्यामुळे त्यात थेट दहा हजार रुपयांची वाढ केली आहे. म्हणजे 16 हजार रुपये मिळतील.जे नागरिक अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील आहेत त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी निर्वाह भत्त्यात सुधारणा केली.यामध्ये पाचवीच्या विद्यार्थी वर्गाला अधिक प्रोत्साहन प्रदान करण्यासाठी शिष्यवृत्ती वाढवली आहे.
लातूर या ठिकाणी पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन केली जाईल व पुणे या ठिकाणी चार अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन होतील.अतिरिक्त अशा न्यायालयाने व जलद गतीने न्यायालयांना तब्बल दोन वर्षांची मुदत वाढ होईल.मानसिक आजार मुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृह योजना स्वातंत्रपणे तयार केली जाईल. यासोबतच सैनिकांना घरांसाठी जमिनी वक्त करून देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा यामध्ये वाढवण्यात आले आहे.चिमूर व शिर्डी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना केली जाईल.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी ,शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा !