Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ farmer crops loan at zero percentage ] : शेतकऱ्यांना बँकेकडून 3 लाख रुपये पर्यंत अल्प मुदतीचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने उपलब्ध करुन दिली जाते . यामुळे शेतकऱ्यांना सदर पीक कर्ज योजना अंतर्गत मोठी सवलत मिळते .
कर्जाची स्वरुप : यांमध्ये शेतकऱ्यांना 3 लाख रुपये पर्यंत कर्ज शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिले जाते . त्यावरील कर्ज रक्कमेवर बँकेच्या व्याजदरानुसार व्याज भरावे लागेल . म्हणजेच केवळ 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज हे शुन्य टक्के व्याजदरासाठी पात्र असणार आहेत .
सदर योजना ही पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना म्हणून ओळखली जाते . यांमध्ये वेळोवेळी व्याज दर सवलतीत बदल करण्यात आलेले आहेत . पुर्वी 4 टक्के सवलत दिली जात होते , तर सदर योजना अंतर्गत दि.03.12.2012 रोजीच्या निर्णयानुसार 1 लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर शुन्य टक्के व्याजदर तर 1 लाख ते 3 लाख रुपये पर्यंतच्या कजार्ववर 2 टक्के व्याजदर आकारले जात होते .
परंतु राज्य सरकारने यांमध्ये बदल करुन 3 लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज हे सरसकट शुन्य टक्के व्याजदराने उपलब्ध करुन देण्याचा महत्वपुर्ण बदल सदर योजनांमध्ये करण्यात आलेला आहे .सदर सवलत घेण्याकरीता शेतकऱ्यांना सदर कर्जाची परतफेड ही विहीत मुदतीमध्ये करणे आवश्यक असते .
सदरचे कर्ज हे अल्प मुदतीचे असुन , सदर कर्जाची परतफेड ही विहीत मुदतीत केल्यास , आपणांस सदर योजना अंतर्गत सरकारकडून कर्जाची सवलत दिली जाते . जर आपण सदर कर्जाची परतफेड विहीत मुदतमध्ये न केल्यास , आपणांस बँकेच्या प्रचलित व्याजदरानुसार कर्जाची परतफेड करावी लागते . या संदर्भातील सहकार व पणन विभाग मार्फत निर्गमित शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .