Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ election volunteer niyukti ] : विधानसभा सार्वती निवडणुका 2024 मध्ये मतदान प्रतिनिधींची नियुक्ती करणे संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्यामार्फत दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहे की , मतदान प्रतिनिधी सर्वसाधारणतः स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असेल,  त्याचबरोबर संबंधित मतदान केंद्राचा किंवा सदरच्या मतदान केंद्राचा मतदार असणे अभिप्रेत असेल , तथापि भारत निवडणूक आयोगाने त्यामध्ये काही सवलत दिली असून , मतदान प्रतिनिधी नियुक्तीस अडचणी येत असल्यास , त्या विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदाराला मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येणार आहे .

त्याचबरोबर मतदान प्रतिनिधीकडे त्यांचे मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या कोणत्याही पर्यायी कागदपत्र ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र /  ओळखपत्र असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर ग्रामपंचायत , सरपंच, पंचायत सदस्य नगरसेवक / महानगरपालिका किंवा नगरपालिकेचे सदस्य किंवा स्थानिक व्यक्तींना मतदार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंधन नाही .

त्याचबरोबर राज्य किंवा केंद्र शासनाचे सध्याचे मंत्री संसद सदस्य महानगरपालिका / जिल्हा परिषद /  पंचायत समिती सभापती / अध्यक्ष त्याचबरोबर महानगरपालिकेचे महापौर तसेच राज्य व केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रम शासकीय संस्था / महामंडळे यांचे अध्यक्ष सदस्य शासनाकडून मानधन घेणाऱ्या व्यक्ती शासन अनुदानित संस्थांमध्ये अर्धवेळ काम करणाऱ्या व्यक्ती तसेच शासन अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत अर्धवैद्यकीय आरोग्य सेवा कर्मचारी रास्त भाव दुकानाचे व्यापारी इत्यादी यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येणार नसल्याचे , नमूद करण्यात आले आहेत .

सरकारच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती देता येणार नाही : शासनाच्या सेवेत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येणार नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे . असे केल्यास , ही नियुक्ती लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 134 खाली गुन्हा असेल , आणि अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांना 03 महिन्यापर्यंतची तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकणार शकतील .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *