Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ plant for snake never intry our home ] : भारतामध्ये साप दिसला की त्यास मारले जाते , परंतु आपल्या माहितीस्तव भारतामध्ये आढळणाऱ्या सापाच्या 90 टक्के जाती हा बिनविषारी सापाच्या आहेत . तर यामध्ये केवळ दहा टक्केच साप हे विषारी आहेत , ज्यामध्ये घोणस , फुरसे ,मन्यार व नाग या जातीचे साप विषारी आहेत .
सदर विषारी सापांच्या चावामुळे तात्काळ उपचार घेतल्यास व्यक्तींचा जीव वाचला जातो . परंतु सर सापांच्या चावामुळे व्यक्ती विषाने कमी तर भीतीमुळेच जीव सोडून देतो . यावर तात्काळ उपचार घेणे आवश्यक असते . साप हा कधीच स्वतःहून इतरावर हल्ला करत नसतो , तर त्यास धोका जाणवल्यास तो हल्ला करत असतो .
सापाचे मुख्य भक्ष म्हणजे उंदीर , घुशी हे आहेत . यामुळे आपल्या परिसरात सदर उंदीर , घुशी होणार नाहीत , याची काळजी घेणे आवश्यक आहे . त्याचबरोबर काही तीव्र वास असणाऱ्या जे की सापास दुर्गंध वाटतात , अशा वनस्पतींमध्ये प्रमुख तीन वनस्पतींचा समावेश आहे जे आपल्या परिसरात लावल्यास सदर परिसरामध्ये साप भटकंती करीत नाही .
यामध्ये सर्पगंध तसेच मगवॉर्ट व लसूण या तीन प्रकारच्या वनस्पती आपल्या घरांच्या परिसरात लावल्यास साप सदर परिसरामध्ये फिरकत नाही . कारण सदर वनस्पतींचा वास सापास सहन होत नसतो . तर या वनस्पतीपैकी सर्पगंध ही वनस्पती सापाच्या दंश झाल्यानंतर , देखील औषध म्हणून वापरता येते.
यामुळे वरील नमूद वनस्पती आपल्या परिसरामध्ये लावावे जेणेकरून , आपल्या परिसरामध्ये सापाची भटकंती होणार नाही .