Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee family anukampa appointment Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती देणे संदर्भात , राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण सुधारित निर्णय (GR) निर्गमित झालेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य शासन सेवेत निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे बाबत सुधारित तरतुदी लागू करण्यात आलेली आहे . सदर धोरणानुसार गट ड प्रतीक्षा सूची मधून गट क च्या प्रतीक्षा सूचीमध्ये नाव वर्ग करणे , पदानुसार आवश्यक तांत्रिक अहर्ता धारण करणाऱ्यांना नियुक्तीची कार्यवाही , तसेच बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नियुक्ती देणे बाबत तरतुदी करण्यात आलेली आहे .
गट ड मधून गट क प्रतीक्षा सूचीमध्ये नाव वर्ग करणे : गट ड संवर्गातील प्रतीक्षा सूची मधील उमेदवाराने गट क पदाकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक अहर्ता प्राप्त केली असेल त्यांच्या शैक्षणिक अर्हतानुसार गट क च्या प्रतीक्षा सूचीमध्ये नाव समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे . याकरिता संबंधित उमेदवाराला आपल्या आस्थापनेला आवेदन सादर करावे लागेल .
तांत्रिक अर्हतानुसार अनुकंप नियुक्ती : ज्या – ज्या पदाकरिता तांत्रिक अर्हता यामध्ये टंकलेखन लिपिक संवर्गातील पदावर नियुक्ती करण्याकरिता संबंधित तांत्रिक पात्रता असणे आवश्यक असेल . तसेच सदर पदावरील नियुक्ती धोरणानुसार अर्हताबाबत वेळोवेळी लागु करण्यात आलेले नियम लागू असतील .
बेपत्ता झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती : सरकारी सेवेत असताना बेपत्ता झालेल्या जे की , सक्षम न्यायालयाने मयत घोषित केल्यानंतर सदर कुटुंबीयातील सदस्यांना अनुकंप तत्त्वावरील नियुक्ती अनुज्ञेय ठरते , यामध्ये बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली जाते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.