Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ school leave letter] : राज्याच्या विधानसभा निवडणुका दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न होणार आहेत . त्यामुळे राज्यातील शाळांना सलग तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे . या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की , माननीय शिक्षण आयुक्त यांच्या प्रस्तावानुसार दिनांक 18 ते 20 नोव्हेंबर 2024 या तीन दिवस राज्यातील शाळा बंद ठेवणे संदर्भात उपसचिव यांच्याकडून परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडाव्यात याकरिता , ज्या ठिकाणी निवडणूक कर्तव्यासाठी शाळा नियोजित आहेत , अशा ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसल्याने दिनांक 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सदर शाळांना सुट्टी जाहीर करावी , तर ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य असेल ,  त्या ठिकाणी शाळा भरवावे असे निर्देश देण्यात आले आहेत .

या संदर्भात संबंधित शिक्षण आयुक्त यांच्यामार्फत निर्णय घेण्यात यावा , असे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेली आहे . राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये निवडणूक पार पाडले जाते ,  यामुळे सदर सुट्टीचा निर्णय शालेय शिक्षण व घेण्यात आलेला आहे .

या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून येऊ शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *