Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ keshar farming see detail] : मराठवाड्यात केशर उत्पादनाचा यशस्वी प्रयोग छत्रपती संभाजीनगर येथे एका निवृत्त कृषी अधिकाऱ्यांनी केला आहे . या माध्यमातून तो वर्षाकाठी लाखोंची कमाई करत आहे .

केशर शेतीसाठी भारतात आवश्यक वातावरण हे जम्मू कश्मीर मध्ये आहे . इतर राज्यामध्ये त्याकरिता आवश्यक पोषक वातावरण नाही , यामुळे इतर राज्यात केशरची शेती केली जात नाही . केशरची मागणी अधिक असून , भारतात उत्पादन खूप कमी होते .  यामुळे केशरची किमती प्रति किलो पाच लाख रुपये इतके आहे .

छत्रपती संभाजी नगर येथील उस्मानपुरा येथे वास्तव्य करणाऱ्या सेवानिवृत्त कृषी अधिकारी लक्ष्मीकांत अपसिंगेकर व त्यांच्या पत्नी मीना अपसिंगेकर यांनी यूट्यूब च्या माध्यमातून माहिती घेवून केशर शेती करण्याचा निर्णय घेतला . तर त्याने पुण्यामध्ये जाऊन केशर लागवडी विषयक प्रशिक्षण घेतले .

केशरला आवश्यक वातावरण तयार करण्यात आले , ज्यामध्ये लाइटिंग ची व्यवस्था , जम्मू काश्मीर सारख्या वातावरणाची निर्मिती करण्यात आली , ज्यामध्ये हवेची आर्द्रता 70 टक्के तर तापमान दिवसा 21 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवण्यात आले , तर रात्रीचे तापमान 8° c दरम्यान ठेवण्यात आली .

तर पिकांची लागवड करण्यासाठी 800 रुपये प्रति किलो प्रमाणे 80 केशर कंद विकत घेवून त्याची लागवड केली आहे . या माध्यमातून अपसिंगेकर कुटुंब वर्षाला चांगली कमाई करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *