Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ election niyukt employee sanugrah anudan ] : निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा प्रदानाकरिता कर्तव्यावर असताना मृत्यू अथवा जखमी झाल्यास , सानुग्रह अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे .
निवडणूक आयोगाच्या दिनांक 11 एप्रिल 2019 रोजीच्या परिपत्रकामध्ये राज्य सरकारने सुधारणा करून , सानुग्रह अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे . यामध्ये मृत्यू , व जखमेच्या प्रमाणानुसार सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे . सानुग्रह अनुदान बाबत सविस्तर नियमावली खालील प्रमाणे पाहुयात .
यामध्ये निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास , त्याच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपये सानुग्रह अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे , सदर निर्णयामध्ये सुधारणा करून राज्य शासनाने 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे . म्हणजेच सदर सानुग्रह अनुदान रक्कमेत दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.
तर बॉम्बस्फोट , अतीरेकी कारवाया अशा अन्य प्रकारच्या घटनांमुळे निवडणूक अधिकारी / कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास , त्यांना 20 लाख रुपयाचे सहानुग्र अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे . आणि कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे .
तर निवडणूक कर्तव्यावर असताना किरकोळ अपंगत्व आल्यास , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपये सहानुग्र अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे . तर राज्य सरकारने सदर सानुग्रह अनुदानामध्ये वाढ केल्याने , निवडणूक नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.