Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Salary account benifits] : आपले बँकेत सॅलरी अकाउंट असल्यास , अशा ग्राहकांना काही महत्त्वपूर्ण फायदे मिळत असतात . असे लाभ अनेकांना माहित नसल्याने , त्याचा फायदा काही क्वचित ग्राहकच घेत असतात . नेमके कोणकोणते लाभ सॅलरी अकाउंटवर मिळतात , ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .
अल्प व्याजदरामध्ये कर्ज सुविधा : पगारदार खाते असणाऱ्यांना कमी व्याजदरामध्ये वैयक्तिक कर्ज ( Personal loan ) , ग्रह कर्ज ( Home loan) तात्काळ दिले जाते . याकरिता कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता लागत नाही. याशिवाय सदर ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट ची सुविधा उपलब्ध करून दिली जाते , ज्या माध्यमातून अत्यावश्यक वेळी ग्राहकांना उधार पैसे काढता येते .
क्रेडिट कार्ड सुविधा : इतर खातेदारकांपेक्षा पगारदार खातेधारकांना क्रेडिट सुविधा आकर्षक ऑफरसह दिले जाते , याशिवाय यामध्ये वार्षिक शुल्क सवलत तसेच रिवॉर्ड्स देण्यात येते .
फ्री चेकबुक आणि डेबिट कार्ड सुविधा : पगार खातेधारक असणाऱ्यांना फ्री मध्ये चेक बुक , डेबिट कार्ड दिले जाते . याशिवाय एटीएमच्या माध्यमातून फ्री / अतिरिक्त शुल्काशिवाय कॅश काढता येते .
झिरो बॅलन्स ची सुविधा : सॅलरी अकाउंट असणाऱ्यांना झिरो बॅलन्सची (zero balance facility) सुविधा असते , म्हणजेच सदर अकाऊंटवर Monthly average balance ची आवश्यकता नसते , याकरिता बँकेकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही .
विमा सुविधा : खास करून ही सुविधा अनेक ग्राहकांना माहीत नसते , ती म्हणजे सॅलरी खाते (Salary account) असणाऱ्यांना अपघाती मृत्यू विमा त्याचबरोबर आरोग्य विमाचे कव्हर दिले जाते . ही सुविधा सर्व अकाउंट असणाऱ्यांना अतिरिक्त सुरक्षा प्रदान करत असते , जी की इतर खातेधारकांना मिळत नसते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.