Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ gold rate reduce news] : सोन्याची किमतीमध्ये सतत मोठी घसरण होत आहे . यामुळेच ग्राहकांची खरेदी करिता गर्दी दिसून येत आहे . कारण सोन्याच्या किंमतीत परत लग्नसराई मध्ये वाढ होईल की काय ? या भीतीमुळे सोन्याची खरेदी केली जात आहे .
दिवाळी सणाच्या नंतर पहिल्याच आठवड्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरण होताना दिसून आले , कालपर्यंत सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झालेली आहे . तुळशी विवाह नंतर लग्नसराई सुरू होईल , त्यादरम्यान परत सोन्याच्या किमती वाढतील अशा भीतीने सद्यस्थितीत ग्राहकांची खरेदीवर भर दिसत आहे .
कालचा सोन्याचा भाव : बुलेटीन मार्केट या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार , काल दि.08.11.2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचे भाव 77,670/- रूपये प्रति दहा ग्रॅम (प्रती तोळा) होता , तर 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 71,198/- रूपये इतके आहे . मागील आठवड्यामध्ये 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 79,020/- रुपये इतकी होती .
सोन्याच्या किमतीत परत घसरण : मागील दोन महिन्यापासून शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आल्याने , गुंतवणूकदार शेअर बाजारातील पैसे सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे , यामुळे सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढले आहेत . तर आता शेअर बाजार स्थिर होताना दिसून येत असल्याने , सोन्याच्या किमतीत 73 ते 75 हजार रुपये पर्यंत घसरण होण्याचा तज्ञांचा अंदाज आहे .