Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee transfer new timetable ] : कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सुधारित वेळापत्रक बाबत सुधारित परिपत्रक दि.07 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत . सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण दिनांक 18 जुन 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहेत , त्यानुसार तसेच यापुर्वी शासनाने वेळोवेळी विहीत करण्यात आलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहेत .
मा.उच्च न्यायालय नागपुर येथे दाखल अवमान याचिका दि.25.10.2024 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मा.उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपुर्ण बदली प्रक्रिये दरम्यान संपुर्ण राज्याकरीता विहीत करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावेत असे निदेश देण्यात आलेले आहेत .
तद्नुषंगाने कळविण्यात येत आहे कि , यापुढे राबविण्यात येणाऱ्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारण पणे संचमान्यतेची प्रक्रिया पुर्ण होवून शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्याच्या नंतर सबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पुर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश आहेत .
याबाबतचा वेळापत्रक पुढील प्रमाणे पाहु शकता ..
सदर बदली बाबत ग्राम विकास विभाग मार्पत दि.07.11.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.