Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ pensioners life certificate ] : पेन्शनधारकांसाठी हळदीचा दाखला वर्षाच्या शेवटी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापूर्वी सादर करणे आवश्यक असते . आता हयातीचा दाखला काढण्यासाठी पेन्शनधारकांना ऑनलाइन घरी बसून मोबाईलच्या माध्यमातून काढता येणार आहे .
यासाठी आपल्याला प्ले स्टोर वरून JeevanPramaan हे ॲप्स डाऊनलोड करून घ्यावे , त्याचबरोबर आपल्याला आणखीन एका ॲपची आवश्यकता असते ती म्हणजे AdhaarFaceRD हे ॲप्स प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यावेत .
त्यानंतर जीवन प्रमाण या ॲप्सवर प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे , ज्यामध्ये आधार नंबर , ईमेल आयडी , मोबाईल नंबर या प्रकारच्या माहिती भरून सबमिट करावे .
त्यानंतर पेन्शनर आयडेंटिफिकेशन मध्ये पेन्शनधारकाचे नाव , पेन्शन अकाउंट नंबर , PPO नंबर , bank name अशी माहिती टाकून Next या बटणावर क्लिक करावेत.
त्यानंतर Face RD या ऑप्शनवर क्लिक करून फेस स्कॅन करून घ्यावेत , त्यानंतर गुगल वर जाऊन जीवन प्रमाण या संकेतस्थळावर क्लिक करून पेन्शनर लॉगिन या ऑप्शन वरती जावून आपल्याला मिळालेल्या प्रमाण आयडी त्या ठिकाणी टाकून हयातीचा दाखला डाऊनलोड करू शकता .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.