Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahavika sa gadi pansutri jahirnama ] : विधानसभा निवडणुका 2024 करिता महायुती पक्षाकडून जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर , महाविकास आघाडी मार्फत लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करण्यात आली आहे . यामध्ये महायुतीपेक्षा काही अधिक लाभदायक योजनांचा समावेश करण्यात आला आहे .
महिलांसाठी खास योजनांचा समावेश : विद्यमान सरकारने लाडकी बहीण योजना तसेच महिला व मुलींना 50% सवलतीत बस प्रवास अशा सुविधा देण्यात आलेले आहेत . या योजनांना शह देण्याकरिता महाविकास आघाडी करून पंचसूत्री मध्ये महिलांना महालक्ष्मी या योजनांतर्गत दरमहा 3,000/- रुपये देण्याची त्याचबरोबर महिला व मुलींना मोफत बस प्रवास सुविधा बाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे .
कुटुंब रक्षण : राज्यातील नागरिकांना कुटुंब रक्षण करिता 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा देण्याचे तसेच मोफत औषधे देण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे .
समानतेची हमी : सदर जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडी कडून नमूद करण्यात आले आहे की , जर राज्यात सत्ता स्थापन झाल्यास , जातीनिहाय जनगणना केली जाईल . त्याचबरोबर 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न केले जाईल .
कृषी विभागाकरिता योजना : शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन दिले जाईल . अशी तरतूद जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली आहे .
बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4,000/- रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद सदर जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेली आहे .