Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ new pay commission new big update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . नविन वेतन आयोगांमध्ये पगार व इतर भत्ते यामध्ये मोठी वाढ होणार आहे .
नविन वेतन आयोग नेमका कधी लागु होणार ? : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग ( New Pay Commission ) सन 2026 मध्येच लागु करण्यात येईल , याकरीता केंद्र सरकारकडून येत्या अर्थसंकल्पांमध्ये नविन वेतन आयोगाची तरतुद होणे अपेक्षित आहे . याकरीता कर्मचारी युनियन मार्फत वेळोवेळी निवेदन सादर करण्यात येत आहेत .
कर्मचारी युनियनच्या वारंवार होणाऱ्या मागणीचा विचार करता , केंद्र सरकारला नविन वेतन आयोगाची स्थापना करणे गरजेची बाब ठरणार आहे . याकरीता विरोधांकडुन वारंवार प्रश्न देखिल उपस्थित करण्यात येत आहे . जर सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु सन 2029 मध्ये परत लोकसभा / विधानसभा निवडणुकी हा मुद्दा अधिकच चर्चेचा विषय ठरेल .
सन 2029 पर्यंत अंमलबजावणी : सन 2029 पर्यंत नविन वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल , याकरीता केंद्र सरकार मार्फत लागु करण्यात आलेल्या आयोगाचा अभ्यास करुन , राज्य सरकार देखिल नविन वेतन आयोगाची स्थापना व अंमलबजावणी करण्यात येईल .
महागाई वाढीनुसार फिटमेंट फॅक्टर मधील वाढ : फिटमेंट फॅक्टर मधील वाढ म्हणजे कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनातील वाढ होय . कर्मचारी युनियन मार्फत फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी केली जात आहे . यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनात 18,000/- रुपये वरुन 26,000/- रुपये इतकी वाढ होणार आहे .
तर राज्य कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनांमध्ये 15,000/- रुपये वरुन 21000/- रुपये इतकी वाढ होईल , यानुसार कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनावर आधारित सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येईल .
इतर देय भत्यामध्ये वाढ : कर्मचाऱ्यांना इतर देय असणाऱ्या भत्यामध्ये वाढ होईल , जसे कि , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता ,प्रोत्साहन भत्ता परंतु महागाई भत्ताचे दर परत शुन्य टक्के होईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.