Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ pension first right for family pension ] : सरकारी कर्मचारी असेल अशा प्रसंगी त्याच्या मृत्यूनंतर सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार त्याच्या पेन्शनवर त्याच्या कुटुंबीयातील वारसदारातून पहिला अधिकार कोणाला असेल ? याबाबत नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे .
यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियातील मुलींना देखील त्यांच्या वडिलांच्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे . सदर नियम केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 नुसार सुधारित करण्यात आला आहे . यामध्ये नमूद करण्यात आली आहे की , विवाहित, अविवाहित तसेच दत्तक व विधवा मुलींचा समावेश असणार आहे . तर यामध्ये अपंग मुलींना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे . याकरिता कर्मचाऱ्यांस आपल्या कुटुंबीयांचा तपशील अद्यावत ठेवणे आवश्यक असणार आहे.
सरकारने पेन्शन नियमांमध्ये सुधारणा केल्यानुसार , कर्मचाऱ्याला जर मुलगी अपत्य असेल , तर तिचा कुटुंब सदस्य याप्रमाणे वडिलांच्या पेन्शनमध्ये हक्क बजावता येणार आहे . म्हणजेच फॅमिली पेन्शनमध्ये , मुलींचा समावेश करणे बंधनकारक असणार आहे . केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 नुसार विवाहित , अविवाहित , दत्तक तसेच सावत्र आणि विधवा मुलींचा समावेश करण्यात आलेला आहे .
पेन्शन कल्याण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार , कौटुंबिक पेन्शन करिता मुलींचे नाव वगळता येणार नाही . याकरिता शासकीय कर्मचाऱ्यास शासन सेवेत असताना , आपल्या कुटुंबाचा तपशीलमध्ये आई-वडील , मुले , अपंग भावंडे यांचा तपशील सादर करणे आवश्यक असणार आहे .