Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ employee election Publicity work against action] : कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रचार कामांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत दिनांक 05 नोव्हेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की , सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे . या आचारसंहितेमध्ये मा.निवडणूक आयोग यांच्याकडून आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे विविध प्रकारचे निर्देश देण्यात आले आहे .

त्यानुसार मा.निवडणूक आयोग यांचे आचारसंहिता पालन संदर्भातील निर्देश त्याचबरोबर शासन निर्णय दिनांक 20 मे 2010 नुसार राज्यातील अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सामायिक परिनियम अस्तित्वात येईपर्यंत म. ना. सेवा नियमांमधील तरतुदी लागू करण्यात आलेले आहेत . करिता महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम 05(01) मध्ये नमूद केल्यानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही ..

किंवा त्याच्याशी अन्यथा संबंध ठेवता येणार नाही , किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात कोणत्याही प्रकारे भाग घेता येणार नाही , किंवा सहाय्य करता येणार नाही . तसेच तो कर्मचारी कोणत्याही विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणुकीत प्रचार करू शकणार नाही , किंवा अन्यथा हस्तक्षेप करू शकणार नाही . किंवा त्यासंबंधी आपले वजन खर्च करू शकणार नाही , किंवा त्यात भाग घेऊ शकणार नाही याकडे लक्ष वेधण्यात येत आहे .

त्याचबरोबर मतदानाचा टक्का वाढावा याकरिता आपल्या अधिनस्त महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी / विद्यार्थिनींना मतदान करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करावेत अशी बाब नमूद करण्यात आली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *