Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ employee Suraksha related rules ] : आपण जर शासकीय अधिकारी / कर्मचारी असाला तर , आपणांस आपल्या सुरक्षा विषयक काही नियम / कायदे माहित असणे आवश्यक असेल . सदर कायदे / नियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
IPC 353 / IPC 504 : शासकीय कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा कोणी आणत असल्यास , अशा विरोधात इंडियन पिनल कोड 353 अंतर्गत 02 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा नमुद आहे . तर IPC 504 अंतर्गत एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांस वाद घालणे / अपशब्द वापरणे / शिविगाळ करणे हा इंडियन पिनल कोड 504 अंतर्गत गुन्हा असुन , अशा गुन्हेगार विरोधात 02 वर्षाची सश्रम कारावासाची तरतुद आहे .
IPC 232 & 333 : IPC 232 & 333सदर कायद्या अंतर्गत एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांस मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे , अशा गुन्ह्या विरोधात गुन्हे नुसार किमान 03 ते 10 वर्षे पर्यंत सश्रम करावासाची तरतु आहे , तर सदर गुन्हास 06 महिने जामिन मिळत नाही .
IPC 353 ,384 ,386 : सदर कायद्या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांस खंडणी मागण्याचे तसेच ब्लॅकमेल करणे असा प्रकार उघडकीस आल्यास सदर गुन्हेगारा विरोधात किमान 02 वर्षे तर कमाल 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा नमुद आहे .
IPC 506 : सदर इंडियन पिनल कोड 506 अंतर्गत एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांस धमकी देत असेल तर अशा गुन्हा विरोधात किमान 03 वर्षे तर कमाल 07 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा नमुद आहे .
IPC 146 , 148 , 150 : सदर सुरक्षा कायद्या अंतर्गत सरकारी कार्यालयांमध्ये कामकाज प्रसंगी गोंधळ तसेच अर्वाच्च करुन अडथळा निर्माण करत असल्यास , अशा गुन्ह्या विरोधात सदर कलम अंतर्गत किमान 06 महिने ते 02 वर्षापर्यंत सश्रम कारावासाची तरतुद आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.