Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ AIMIM candidate list ] : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात राज्यात AIMIM चे 14 खासदारांनी फॉर्म भरला आहे .सदर 14 उमेदारांमध्ये 11मुस्लिम तर 3 दलित उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे . सदर 14 उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
यापुर्वीचा इतिहास पाहीला असता , राज्यात सन 2014 मध्ये AIMIM ने महाराष्ट्र विधानसभेच्या 24 जागा लढवल्या त्यामध्ये 02 जागा जिंकल्या होत्या , त्यानंतर सन 2019 मध्ये लोकसभाच्या निवडणूकीत 01 जागा जिंकल्या . यंदाच्या निवडणूकीत राज्यातील केवळ 14 जागांवर असदुद्दीन ओवेसीनी उमेदवारी दिली आहे .
यांमध्ये औरंगाबाद पुर्व मधून माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या नावाची घोषणा झाली आहे . तेच राज्य विधानसभा निवडणूकी AIMIM ची धुरा सांभाळणार आहेत . याशिवाय औरंगाबाद मध्य मधून नासिर सिद्दिकी , तर धुळे शहर मतदार संघातुन फारुख शाह अन्वर तर मालेगाव मध्य मधून मुफ्ती इस्माईल कासमी ..
तर भिवंडी पश्चिम मधून वारिस पठाण , भायखळा मतदार संघातून फैयाज अहमद खान तर मुंब्रा कळव्यामधून सैफ पठाण , तर वर्सोवामधून रईस लष्करिया तर सोलापुर मतदार संघातुन फारुख शाब्दी , मूर्तिजापुर मधून सम्राट सुरवाडे , मिरज मधून महेश कांबळे , कारंजा मानोरा मधून मोहम्मद युसूफ , तर नांदेड दक्षिण मधून सय्यद मोईन तर कुर्ला मतदार संघातून बबिता कानडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे .
यांमध्ये 03 दलित उमेदवारांना संधी दिल्याने , ही निवडणूक AIMIM दलित – मुस्लिम यांच्या बळावर लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे .राज्यातील व्होट बँकचा विचार केला असता , राज्यात 12 टक्के मुस्लिम तर 13 टक्के दलित व्होटर आहेत .