आज दि.01 नोव्हेंबर पासुन युपीआय पेमेंट मध्ये 02 मोठे महत्वपुर्ण बदल ; फोन पे , गुगल पे , पेटिएम वापकर्त्यांनी जाणून घ्या सविस्तर बदल !

Spread the love

Iive marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ upi payment rules change from 01 November ] : आज दिनांक 01 नोव्हेंबर 2024 पासुन युपीआय पेमेंट मध्ये 02 महत्वपुर्ण बदल करण्यात आलेले आहेत , सदरचे बदल हे फोन पे , गुगल पे , पेटिएम वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण ठरणार आहेत .

यांमध्ये महत्वपुर्ण बदल म्हणजे दिनांक 01 नोव्हेंबर 2024 पासुन युपीआय लाईट वापरकर्त्यांच्या पेमेंटची मर्यादा ही वाढविण्यात आलेली आहे . यामुळे ही बातमी वापर कर्त्यांसाठी फायद्याची बातमी आहे . भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच युपीआय व्यवहाराची मर्यादा ही वाढवली आहे .

यांमध्ये युपीआय बॅलेन्स हा विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी झाल्यास , अशा वेळी ऑटो – टॉप अप द्वारे पैसे हे युपीआय लाईट मध्ये जोडले जाणार आहे . सदरचा महत्वपुर्ण बदल हा दिनांक 01 नोव्हेंबर 2024 नंतर पाहायला मिळणार आहे .

याकरीता वापकर्त्यांना आता यापुढी मॅन्युअल पद्धतीने टॉप – अप करण्याची आवश्यक राहणार नाही . युपीआयच्या या फिचर्स मुळे पेमेंट्स हे अखंडपणे करता येणार आहेत . युपीआय लाईट हे एक वॉलेट सुविधा आहे , जी कि फोन पे , गुगल पे , तसेच पेटीएम अशा युपीआय पेमेंट ॲप्स देत असतात .

युपीआय लाईट मुळे दरवेळा बँक खात्यांमधून त्यांच्या वॉलेट मध्ये पेसै मॅन्युअली पद्धतीने ट्रान्सफर करावे लागते , परंतु या फिचर्स मुळे आता ऑटो पद्धतीने हे ट्रान्सफर होणार आहेत . ज्यामुळे पेमेंट करताना थेट बँकेतुन पैसे हस्तांतरण न होता , वापर कर्त्यांच्या युपीआय लाईट ( वॉलेट ) मधून केले जाते .

याकरीता आपणांस किमान शिल्लक सेट करावी लागेल , ती रक्कम सेट केल्यानंतर आपली वॉलेट मधील रक्कम ही किमान शिल्लक पर्यंत आल्यास ऑटो पद्धतीने बँकेतुन वॉलेट मध्ये रक्कम ट्रान्सफर होईल .

Leave a Comment