निवडणुका कामकाज करीता नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना अदा करावयाचे मानधन बाबत पत्र / शासन निर्णय .

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty Work Remuneration ] : निवडणुका  कामकाजाकरीता नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना अदा करावयाचे मानधन बाबत कार्यालय मुख्य निवडणूक अधिकारी , दिल्ली यांच्या मार्फत दिनांक 22.03.2024 रोजी पत्र निर्गमित करण्याात आलेला आहे .

अ.क्रकामकाज पदमानधन
01.Sector Officer5,000/- Lum Sum
02.Master Trainer2,000/- Lum Sum
03.Presiding Officer  Counting Supervisor / Reception Supervisor350/- Per Day
04.Polling Officers / Counting Assistant / Reception Assistant250/- Per Day
05.Class – iv / MTS200/- Per Day
06.Packed Lunch And / or Light Refreshment150/- Per Day
07.Video Surveillance Team , Video Viewing Team , Accounting Team , Expenditure Montitoring Control Room And Call Center Staff , Media Certification And Monitoring Committee , Flying Squads , Static Surveillance Team , Expenditure Monitoring cellClass – I/II = 1200 Lum sum   Class – III = 1000 Lum sum   Class – iv = 200 Per Day    
08.Micro Observer1000/- Lum sum
09.Assistant Expenditure Observer7500/- Lum Sum For Full Time Duty

किती दिवसाचे मानधन दिले जाते ? यांमध्ये प्रशिक्षण , मतदान साहित्य गोठा करणे इत्यादीसाठी जास्तीत जास्त 04 दिवस तर प्रत्यक्ष मतदानाचे 02 दिवस असे एकुण 06 दिवस ग्राह्य जातील . म्हणजेच 06 दिवसांचे मानधन ग्राह्य धरण्यात येतील , तर राखीव कर्मचाऱ्यांकरीता 04 दिवस प्रशिक्षणाचे व एक दिवस मतदानाचा असे एकुण 05 दिवसाचे मानधन अदा करण्यात येतील .

यांमध्ये  Reception Duty Staff आणि The Voter Assistant Booth Staff करीता 2 दिवस प्रशिक्षणाचे व 01 दिवस मतदानाचे असे एकूण 03 दिवसाचे मानधन दिले जातील . तर Counting Duty Staff / MTS – IV / Volunteers करीता 2 दिवसांसाठी मानध दिले जातील ..

या संदर्भात निवडणूक आयोगाकडून दिनांक 22.03.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

02 याबाबत राज्य शासनाकडुन निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय..लोकसभा / विधानसभा / पोट निवडणूकीच्या वेळी मतदान / मतमोजणी कामासाठी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्याबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 06.06.2023 व दिनांक 17.11.2023 नुसार देण्यात आलेल्या सूचनांना अनुसरुन महाराष्ट्र राज्यातील लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक / पोट निवडणूकांच्या मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना द्यावयाचा भत्ता पुढीलप्रमाणे मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .

मतदान केंद्र / मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष तैनात करण्यात आलेल्या गृह विभागातील पोलिस कर्मचाऱ्यांनाही वरीलप्रमाणे नमुद भत्याचे दर लागु असणार आहेत . त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या मतदानाचे साहित्य ताब्यात घेणाऱ्या तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ उपस्थित राहणाऱ्या कार्यरत व राखीव अधिकारी / कर्मचारी यांना वरील तक्यात नमुद करण्यात आलेल्या दराप्रमाणे निवडणूक भत्ता अनुज्ञेय असणार आहे .

त्याचबरोबर दुर्गम प्रदेशातील मतदान केंद्रावर / मतमोजणी केंद्रावर निवडणूक संबंधित कामासाठी तैनात मतदान कर्मचाऱ्यांसह पोलिस कर्मचारी , मोबाईल पार्टीमधील कर्मचारी , होमगार्ड , वनरक्षक ग्राम रक्षक दल , NCC कॅडेट्स , माजी सैनिक , स्वयंसेवक इ. करीता पॅक करण्यात आलेले दुपारचे जेवण आणि / किंवा हलका अल्पोहार प्रदान करण्यात येईल .

मतदान अधिकारी / कर्मचारी आणि निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले इतर अधिकारी / कर्मचारी यांना TA / DA ची अदागयी करण्याबाबत प्रकरणपरत्वे मूळ विभाग अथवा निवडणूक विभाग यांच्याकडून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच अधिकारी / कर्मचारी यांना प्रवास भत्ता / दैनिक भत्ता देताना तो त्या-त्या वेळी अनुज्ञेय असणाऱ्या दराने देय असणार आहे .

या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्र.विभागांकडून दिनांक 18.04.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment