Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty’s Employee Leave in Deepavali period ] : निवडणूक कामकाजातुन विशेष सवलत मिळणेबाबत , निवडणूक आयुक्त यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र चे सरचिटणीस विश्वास काटकार यांच्या वतीने सादर करण्यात आलेले आहेत .
सदर पत्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 01 , 02 व 03 नोव्हेंबर 2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने निवडणुक कामकाजातुन विशेष सवलत मिळणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे .
तसेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका दिनांक 20.11.2024 रोजी पार पडणार आहेत , सदर राष्ट्रीय कार्याच्या कामकाजात हजारो राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी सध्या विविध निवडणुकी संदर्भातील प्राथमिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अत्यंत व्यस्त आहेत , तसेच संपुर्ण निवडणुक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी त्यांचेवरच आहे याीच संबंधितांना पुर्ण जाणीव आहे .
दि.01 , 02 व 03 नोव्हेंबर 2024 या तीन दिवशी महाराष्ट्रात दिवाळी हा मोठा सण साजरा केला जाणार आहे , सदर कालावधीत जे राज्य कर्मचारी निवडणुक कामात गुंतलेले आहेत , त्यांना त्यांचे कुटुंबासह सण साजरा करण्यास्तव सध्याच्या कर्तव्य कालावधीत विशेष सवलत देण्यात यावी , अशी नम्र विनंती सदर निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे .
तसेच सर्व जिल्हास्तरीय निवडणुक अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सुचित केल्यास , त्याकरीता उपकृत राहु अशी नम्र विनंती संघटनेचे सरचिटनिस श्री.विश्वास काटकार यांनी केली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.