Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ government employee new pay commission demand ] : सरकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून असणारी नवीन वेतन आयोगाची (new pay commission ) मागणी अखेर पूर्ण होणार आहे . याबाबत केंद्र सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया ..
मिळालेल्या माहितीनुसार , केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करणे संदर्भात प्रस्ताव मुख्य पटलावर आणण्यात येणार आहे . आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये याबाबत विशेष तरतूद केली जाईल , कारण सन 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे . त्या अनुषंगाने सन 2025 पर्यंत नवीन वेतन आयोगाची स्थापना केली जाईल .
नवीन वेतन आयोग संदर्भात लोकसभा , राज्यसभामध्ये वेळोवेळी विरोधी पक्षाकडून प्रश्न उपस्थित केले जात असल्याने , विद्यमान सरकारवर अधिक जोखिमदारी येत आहे . त्यामुळेच विद्यमान सरकारकडून नवीन वेतन आयोगाची हालचाली सुरू करण्यात आलेली आहे . म्हणजेच केंद्राच्या येत्या अर्थसंकल्पामध्ये नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोगाची स्थापना केली जाईल .
किमान मुळ वेतनात होणार मोठी वाढ : कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे 3.68 पट फीटमेट फॅक्टर प्रमाणे किमान मूळ वाढ केली जाणार आहे . यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये 8,000/- रुपयांची वाढ होईल . म्हणजेच किमान मूळ वेतन 18 हजार रुपये वरून 26 हजार रुपये इतका होईल .
हेच प्रमाण महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार केला असता , किमान मूळ वेतनामध्ये 6000/- रुपयांची वाढ होईल . म्हणजेच किमान मुळ वेतन हे 15 हजार रुपये वरून 21 हजार रुपये इतका होईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.