Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ in divapali leave employee stay in work designation] : शालेय शिक्षण विभागाकडून प्राथमिक शाळांना दिनांक 28 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिनांक 28 ऑक्टोबर ते 09 नोव्हेंबर या काळात दीपावली सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
सदर काळामध्ये शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना सुट्टी असते . परंतु यावर्षी विधानसभा निवडणुका असल्याने , प्रशिक्षण काळात देखील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे .
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत , सदर विधानसभा निवडणुकीकरिता , केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण झाली आहे . तर दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण हे दिनांक 08 ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे .
सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये म्हणजेच दिनांक 08 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुख्यालय उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे . कारण सदरचे प्रशिक्षण हे सुट्टीच्या कालावधीमध्ये होणार असल्याने , प्रशिक्षण संदर्भातील पत्रे देणे सुलभ व्हावे याकरिता सदर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुख्यालय थांबण्याच्या सूचना देण्यात आले आहेत .
कारण दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण हे ज्या मतदारसंघांमध्ये नियुक्ती देण्यात येईल , त्या मतदारसंघांमध्ये प्रशिक्षण होणार असल्याने , सदर शिक्षक क्षेत्रा कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याचे सूचित करण्यात आले आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.