Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ additionl pension nirnay ] : दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्यात आली आहे , यामध्ये अतिरिक्त पेन्शन वाढ करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे . यामुळे पेन्शनधारकांना मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .

निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग कडून नुकतेच निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार , अधिक पेन्शनचा लाभ पेन्शनधारकांना दिला जाणार आहे . याकरिता जन्म तारखेचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे . या संदर्भातील सविस्तर निर्णय नेमकं काय आहे ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया .

वयाच्या 80 वर्ष व त्यापेक्षा अधिक वर्ष झालेल्या पेन्शनधारकांना अनुकंप भत्ता स्वरूपामध्ये अतिरिक्त पेन्शन देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे . यामध्ये 80 वर्ष पूर्ण होणाऱ्या पेन्शनधारकांना त्यापासून पुढे सदरचा अतिरिक्त पेन्शन देण्यात येणार आहे . त्यामुळे पेन्शनधारकांना अधिकचा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .

सदर अतिरिक्त पेन्शनची रक्कम 80 वर्ष पूर्ण करणाऱ्या पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ पेन्शनच्या 20% पर्यंत रक्कम प्राप्त होणार आहे . तर 85 ते 90 वर्ष दरम्यान असणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या 30% पर्यंत सदर अतिरिक्त पेन्शनची रक्कम मिळणार आहे . तर 90 ते 99 वर्ष दरम्यान असणाऱ्या पेन्शनधारकांना 40 टक्के पर्यंत अतिरिक्त पेन्शनचा लाभ प्राप्त होणार आहे .

तर शंभर वर्ष व त्यावरील पेन्शन धारकांना शंभर टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे . यासंदर्भात केंद्र सरकारच्या पेन्शन व पेन्शनधारकांचे कल्याण विभागाकडून अधिकृत सूचना निर्गमित करण्यात आलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *