Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ kotak life insurance scholarship program ] : कोटक लाईफ इन्शुरन्स स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 अंतर्गत कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा महत्त्वपूर्ण शिष्यवृत्ती प्रोग्राम असून , सदर योजनेअंतर्गत तामिळनाडू आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याकरिता आर्थिक सहाय्य प्रदान दिले जाते .
आवश्यक पात्रता : सदर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता विद्यार्थी हा महाराष्ट्र किंवा तामिळनाडू राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असेल . विद्यार्थी हा सन 2023-24 मध्ये बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , सदर विद्यार्थी बी.कॉम पहिल्या वर्षामध्ये प्रवेश घेतले असावी ..
त्याचबरोबर सदर विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे कौटुंबिक उत्पन्न 360,000/- किंवा त्यापेक्षा कमी असावे . सदर शिष्यवृत्ती ही सरकारी महाविद्यालयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे . त्याचबरोबर सदर विद्यार्थी इयत्ता बारावी मध्ये 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले असावे .
शिष्यवृत्ती आर्थिक लाभ : सदर शिष्यवृत्ती कार्यक्रम अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण करिता ( तीन वर्षासाठी ) प्रतिवर्षी 30 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते .
आवश्यक कागदपत्रे :
- दहावी /बारावी गुणपत्रक
- ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड , वाहन चालक परवाना, पॅन कार्ड , मतदान ओळखपत्र )
- चालू शैक्षणिक वर्षाचा प्रवेश पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा , बँक तपशील , पासपोर्ट फोटो इत्यादी.
अर्ज करण्याची पद्धत : सदर शिष्यवृत्ती प्रोग्राम अंतर्गत लाभ घेण्याकरिता buddy4study.com या संकेतस्थळावर कोटक जीवन विमा शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25 यावर क्लिक करून , दिनांक 30 ऑक्टोबर पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .