Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ share Market investment Alert ] : शेअर बाजार मध्ये सातत्याने मोठी घसरण होत आहे , काल दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी शेअर बाजारामध्ये निफ्टी 50 व बँक निफ्टी मध्ये मोठी घसरण दिसून आली . सदर बाजार घसरण्याचे नेमके कोणते कारण आहे आणि भविष्यात देखील शेअर बाजाराची स्थिती कशी असेल याबाबतची अपडेट खालील प्रमाणे जाणून घेऊया .
शेअर बाजार घसरण्याचे कारण : मागील दोन आठवड्यापासून शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून येत आहे . याचे मुख्य कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदाराने भारतीय शेअर बाजार मधून मोठी रक्कम काढून घेतल्याने , या महिन्यात शेअर बाजार सातत्याने घसरत आहे . ऑक्टोबर महिन्यामध्ये विदेशी गुंतवणूकदाराने तब्बल 88,244 /- कोटी रुपये काढून घेतले आहे .
याशिवाय सध्या अमेरिकेमध्ये निवडणुका सुरू आहेत , याचा जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात दबाव दिसून येत आहे . याशिवाय चीन सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करून 142 अब्ज डॉलरची मदत पॅकेज जाहीर केल्याने , परदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे काढून चीन देशांमध्ये गुंतवणूक करीत आहेत . याचा विपरीत परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे .
तज्ञांच्या मते आणखीन शेअर बाजारामध्ये घसरण दिसू शकते , यामुळे सद्यस्थितीत खरेदी टाळावी . तज्ञांच्या मते निफ्टी फिफ्टी मध्ये आणखीन 1000/- अंकांची घसरण होऊ शकते . काल दिनांक 25 ऑक्टोबर रोजी निफ्टी-फिफ्टी मध्ये 218.60 अंकांची घसरण होऊन निफ्टी-फिफ्टी 24,180.80 अंकापर्यंत घसरला आहे . तर बँक निफ्टी मध्ये 743 अंकांची घसरण होऊन बँक निफ्टी 50,787.45 अंकावर स्थिर झाला आहे .
सध्या बँक निफ्टी शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे , यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना तज्ञांचा आवश्यक तो सल्ला घेणे आवश्यक आहे . सदरची घसरण ही मागील 52 आठवड्यातील कमालीची घसरण झाली आहे .
शेअर बाजार आणखीन घसरणार : पुढील काही दिवस शेअर मार्केट मध्ये तेजी कायम दिसून येणार आहे , यामुळे गुंतवणूक करीत असताना वेट अँड वॉचची भूमिका घेण्याचे निर्देश तज्ञांनी दिले आहे .