Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee traffic rule helmet use paripatrak ] : शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी सक्तीने हेल्मेट परिधान करणे संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्यामार्फत दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहे की , माननीय न्यायमूर्ती श्री.अभय सप्रे अध्यक्ष , माननीय सर्वोच्च न्यायालय रस्ता सुरक्षा समिती नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी विधान भवन पुणे येथे पुणे शहर तसेच पुणे जिल्हा व विभागातील रस्ते अपघात व पर्यायाने होणारी मृत्यू कमी करण्यासाठी कराव्याच्या उपाययोजनाबाबत बैठक संपन्न झाली . सदर बैठकीस पुणे जिल्ह्यातील शासनाच्या सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते .
भारतात व महाराष्ट्रात रस्ते अपघातात दुचाकी वाहन चालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे , त्याचबरोबर दुचाकी अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठी आहे . तसेच दुचाकी स्वारांनी जर हेल्मेटचा वापर केला , तर अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या मध्ये निश्चित घट होऊ शकते . त्यामुळे वाहन चालकांनी स्वतः आणि सोबत असलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मार्गांची पूर्तता करणाऱ्या हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे . त्यासाठी प्रशासनाने वाहन चालकांसाठी हेल्मेट वापराची सक्ती करावी व वाहतूक नियमाबाबत जनजागृती करावी अशा सक्त सूचना माननीय न्यायमूर्ती श्री. सप्रे यांनी दिले आहेत .
त्याचबरोबर मोटर वाहन कायदा 1988 च्या कलम 229 नुसार तसेच माननीय उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी चालवणाऱ्या त्याचबरोबर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आली आहे .
सबब याद्वारे पुणे विभागातील सर्व शासकीय , निमशासकीय, कार्यालय , महामंडळे , नगरपालिका , महानगरपालिका , नगरपरिषद व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सदर पत्रानुसार सूचित करण्यात येत आहे की , सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक असून , याची पालन करणे प्रत्येक शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कर्तव्य असणार असल्याचे नमूद करण्यात आली आहे . सदर नियमाचे पालन केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.