Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee October month payment/ Pension Shasan Nirnay ] : दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी देय होणाऱ्या माहे ऑक्टोबर 2024 च्या वेतन आणि निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी प्रदान करणे बाबत , राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय दि.24.10.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आली आहे की , दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी देय ठरणारे माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन आणि निवृत्तीवेतन दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी अदा करण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात येत आहे . याकरिता महाराष्ट्र कोषागार नियम 329 मधील तरतुदी शिथिल करण्यात येत आहेत .
माहे ऑक्टोबर 2024 च्या वेदनाची आणि निवृत्तीवेतनाचे प्रदान दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके आणि निवृत्तीवेतन देयके त्वरित यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई संबंधी जिल्हा कोषागार कार्यालय उप कोषागार कार्यालय येथे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदरचा निर्णय जिल्हा परिषद , मान्यताप्राप्त व अनुदानित प्राप्त शैक्षणिक संस्था त्याचबरोबर कृषी विद्यापीठे तसेच कृषी विद्यापीठ व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालय यांचे अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना देखील लागू होणार आहेत .
तसेच माहे ऑक्टोबर 2024 च्या वेतनाचे आणि निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पूर्वी होण्याकरिता , संचालक लेखा व कोषागार कार्यालय मुंबई तसेच सर्व जिल्हा कोषागार कार्यालय व उप कोषागार कार्यालया यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.