Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ election duty niyukt employee training & other work timetable ] : विधानसभा निवडणुका कामकाज करिता नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व इतर कामाचा तपशील या संदर्भात निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे .

सदर वेळापत्रकानुसार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे . तर सदर निवडणूक कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांचे दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी पहिले प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत . त्याचबरोबर दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी नामनिर्देशन सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे .

त्यानंतर दिनांक 04 नोव्हेंबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक असणार आहे . त्यानंतर दिनांक 04 ते 10 नोव्हेंबर दरम्यान वोटर स्लिप वाटप करणे कामकाज राहणार आहे . त्यानंतर दिनांक 6 नोव्हेंबर च्या पुढे पोस्टल बॅलेट कामकाज राहणार आहे . EMV , VVPAT 2ED RANFOMIZATION, तर दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी दुसरे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहे .

दिनांक 15 ते 16 नोव्हेंबर दरम्यान मतदार यंत्र सेटिंग व सिलिंग करण्याचे कामकाज होणार आहे . तर दिनांक 17 , 18 नोव्हेंबर रोजी मतदान साहित्य पिशव्या भरण्याचे कामकाज पूर्ण होणार आहे . त्यानंतर दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान साहित्य वाटप करण्याची तयारी करण्यात येणार आहे . तर दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा दिनांक व साहित्य परत घेण्याचे कामकाज होणार आहे .

दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रशिक्षण तर दिनांक 22 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केंद्राची तयारी तर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतमोजणी करण्याचे कामकाज पूर्ण होणार आहे . याबाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे पाहू शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *