Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ cyclone mhda alert news] : बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादामुळे देशातील काही भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे . सदर चक्रीवादळ 23 ऑक्टोबर पर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

सदर चक्रीवादळामुळे देशातील पश्चिम बंगाल , ओडिसा राज्याच्या किनारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार , सदर चक्रीवादळ अंदमान निकोबार समुद्राच्या वरून पुढे सरकून बंगालच्या खाडीमध्ये येणार आहे . सदर चक्रीवादळ दिनांक 22 ऑक्टोबर व 23 ऑक्टोबर या कालावधीमध्ये रौद्ररूप धारण करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे .

सदर चक्रीवादळाचा रौद्ररूप देशातील उडीसा राज्याच्या काही प्रदेशांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . या संदर्भात हवामान खात्याचे महानिरीक्षक मृत्युंजय महापात्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहेत .

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सदर चक्रीवादळाचा वेग हा 50 किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे . तर दिनांक 24 व 25 ऑक्टोबर रोजी सदर चक्रीवादळाचा वेग 100 ते 110 किलोमीटर प्रतितास इतका राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .यामुळे समुद्री मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे , तर पुढील पाच दिवस समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत .

चक्रीवादळाचा महाराष्ट्रात होणार परिणाम : सदर चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढील तीन दिवस ( दि.22 ते 24 ऑक्टोबर पर्यंत ) अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे . या दरम्यानच्या कालावधीमध्ये गारपिटाची मोठी शक्यता असणार आहे . यामुळे हवामान खात्याने राज्याला देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *