Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ old pension letter send to head sachiv] : जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्या प्रति सादर करण्यात आली आहे .

सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की , राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाने नव्याने जाहीर केलेल्या एकीकृत / युनिफाईड निवृत्ती वेतन योजना ( UPS) , राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजनापैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल ..

असे राज्याचे मा.मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिनांक 04 सप्टेंबर 2024 रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये सांगितले आहे . यावर राजपत्रित अधिकारी महासंघाकडून नमूद करण्यात आली आहे की ,  राज्यसेवेतील अधिकाऱ्यांच्या समस्या व प्रश्न समजून घेण्यासाठी जिल्हानिहाय दौरे सुरू केले आहेत , सदर बैठकांमध्ये अधिकारी निवृत्तीवेतन योजने संदर्भात संभ्रमात व भविष्याच्या दृष्टीने चिंताग्रस्त असल्याचे जाणवत आहे .

निवृत्ती वेतनासाठी वैयक्तिक 10% अंशदान तसेच वर्गणीची अट अनुचित असून नवी पेन्शन योजना सुधारित पेन्शन योजना तसेच एकीकृत पेन्शन योजना यापैकी जुनी पेन्शन योजना लागू करण्या संदर्भात महासंघाने प्रयत्नशील रहावे , यासाठी अधिकारी सदस्य आग्रह धरीत आहे .

यासाठी आयुष्याच्या सायंकाळी आरोग्य विषयक तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर , निवृत्तीवेतन देण्यामागचा विचार समजून घेणे आवश्यक असल्याचे , नमूद करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *