Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ mahayuti jagavatap shikka mortab update ] : दिल्ली येथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये , महायुतीची जागा वाटपावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे . सदर बैठक देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जागावाटपाचा फार्मूला निश्चित करण्यात आला आहे .
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाला 155 जागा , तर शिवसेना एकनाथ शिंदे गट 78 जागा तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला 55 जागेवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे .
तर काही जागेवर अद्याप तिढा कायम आहे सदर जागेवर राज्यपातळीवर चर्चा करून , सोडवण्याच्या सूचना केंद्रीय पदाधिकाऱ्याकडून देण्यात आले आहेत . मुंबईमधील 36 विधानसभा जागेवर भारतीय जनता पार्टी 18 जागा , अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 02 जागा , तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 16 जागेवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे .
तर मुख्यमंत्री पदासाठी मध्यप्रदेश पॅटर्न राज्यात राबवला जाणार असल्याचे , समोर येत आहे . सद्यस्थितीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आला नसून , विधानसभा निकालानंतरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला जाणार आहे . मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहऱ्याची वर्णी यंदा लागू शकते , असा अंदाज सुत्रानुसार समोर येत आहे .
तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी मोठी चर्चा होत आहे . परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्षांच्या संख्याबळानुसार मुख्यमंत्री पदाचा विचार केला जाणार असल्याचे इतर घटक पक्षाकडून सांगण्यात आले आहे .